वाचा:
राज्यात करोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात जवळपास ९ हजार नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे चिंता वाढत चालली असताना आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत परिस्थितीवर सर्वंकष चर्चा करण्यात आली. करोना संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मास्क लावणे, हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसुत्रीविषयी नागरिकांत जनजागृती करणे, मोहिमेची अंमलबजावणी करणे तसेच सर्वांना लसीकरण याबाबत बैठकीत सादरीकरण करण्यात आले. मी जबाबदार मोहीम व लसीकरणास प्राधान्य देण्याचेही निश्चित करण्यात आले.
वाचा:
दरम्यान, करोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्यावर पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकट घोंगावू लागले आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत प्रत्यक्षात लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला होता. नागरिकांनी नियम पाळले नाहीत तर पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बजावले होते. करोना संदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा. गरज भासल्यास कठोर निर्णय घ्या, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आधीच दिलेली आहे. हे पाहता आजची मंत्रिमंडळ बैठक महत्त्वाची ठरली आहे. बदलत्या परिस्थितीत सरकारी पातळीवर वेगवान घडामोडी होताना दिसत आहेत.
वाचा:
‘ही’ रुग्णवाढ चिंतेत भर घालणारी…
– राज्यात आज ८० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४५ % इतका.
– आज राज्यात ८ हजार ८०७ नवीन रुग्णांचे निदान तर २ हजार ७७२ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– आतापर्यंत एकूण २० लाख ८ हजार ६२३ रुग्णांनी करोनावर केली मात.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ९४.७० टक्के.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५९ लाख ४१ हजार ७७३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख २१ हजार ११९ (१३.३१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात २ लाख ९५ हजार ५७८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये तर २ हजार ४४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.
– राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५९ हजार ३५८ वर. सर्वाधिक १० हजार ४२७ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times