म. टा. प्रतिनिधी, मुंबई

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वाद आणि आरोपांचा सामना करणारे शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री यांच्या समर्थकांनी मंगळवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडावर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे चौफेर टीका आणि संताप व्यक्त होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही त्या गर्दीबाबत आक्षेप नोंदवला आहे. आघाडी सरकारमधील घटक पक्षांनीच टीकेचा सूर लावल्याने शिवसेना या प्रकरणात खिंडीत सापडली आहे.

पोहरादेवी गडावर करोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर मुख्यमंत्री यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. मुख्यमंत्री ठाकरे तसेच, संपूर्ण प्रशासन करोना रोखण्याच्या प्रयत्नात असताना राज्यातील एक मंत्री अशी गर्दी जमवत असेल तर ते सरकारच्या प्रतिमेला शोभत नाही. यामुळे पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, चौकशीअंती सत्य समोर येईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे म्हणणे आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांच्या कार्यक्रमास होणाऱ्या गर्दीबाबत कोणी काही बोलत नाही, असेही पटोले यांचे म्हणणे आहे. मात्र, थोरात यांनी पोहरादेवी गडावर झालेल्या गर्दीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. करोना रोखण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन ठाकरे यांनी यापूर्वीच केलेले आहे. तरीही राठोड यांच्या समर्थकांनी गर्दी केली. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून कारवाई केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here