मुंबईः अहमदाबादमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. त्यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी नरेंद्र मोदींना मृत्यूनंतर आपल्याला कोणी लक्षात ठेवणार की नाही याबद्दलची खात्री नसल्यानेच स्टेडिअमला आपलं नाव दिल्याची टीका केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मतदारसंघामध्ये हे भव्य स्टेडियम उभारण्यात आलं आहे. त्याचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते बुधवारी झाले. स्टेडियमच्या नव्या रुपाचे उद्घाटन होत असताना त्याचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. यावरुनच प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

वाचाः

प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्वीट करत मोदींवर निशाणा साधला आहे. ‘काय नेता मिळाला आहे देशाला. यांना लोक आपल्याला विसरुन जातील याची चिंता आहे. यांचा लोकांवर विश्वास नाही, की मृत्यूनंतर कोणी आपल्याला लक्षात ठेवेल की नाही. म्हणून मृत्यूआधी स्टेडियम आपल्या नावे करुन घेतलं,’ अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

रिलायन्स एण्ड, अदानी एण्ड

दरम्यान, या स्टेडियमच्या खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंना म्हणजेच एण्डना दिलेली नावंदेखील टीकेचा विषय ठरली आहेत. खेळपट्टीच्या एका टोकाचे नाव रिलायन्स एण्ड तर, दुसऱ्या टोकाचे नाव अदानी एण्ड आहे. यावरुन खिल्ली उडवली गेली आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here