पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपनं अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या महिला अध्यक्ष यांनी आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर वानवडी पोलिस ठाण्यात जाऊन, आरोपी विरोधात गुन्हा का दाखल केला नाही, असा जाब पोलिसांना विचारला. पोलीस कुणाची चाकरी करत आहेत,’ असा सवालही त्यांनी केला.
वाचा:
पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप कुणीही तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळं आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही, असं वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितलं. त्यामुळं चित्रा वाघ संतप्त झाल्या. एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे आणि तक्रार आलेली नाही असं पोलीस म्हणतात. ते स्वत:हून दखल घेऊ शकत नाहीत का? कोणाच्या आदेशाची वाट बघत आहात? ह्यांना लाज वाटली पाहिजे. पोलीस हे महिलांचे रक्षक आहेत की भक्षक?,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला. ह्या खुन्याला पोलीस वाचवताहेत, असा थेट आरोप त्यांनी केला.
वाचा:
‘या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी असतानाही त्यांना सोडून देण्यात आले. वानवडी पोलीस काम करत नसून केवळ दिखावा करत आहेत. त्यामुळे वानवडी पोलिसांकडून तपास काढून घेऊन तो सक्षम पोलीस अधिकाऱ्याला द्यावा, अशी मागणी वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times