मुंबई: वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली असून खेळाच्या मैदानांवरही लक्ष केंद्रित केलं आहे. मैदानावरील गर्दीतून करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून महापालिकेनं मुंबईतील ऐतिहासिक तूर्त बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ( To Shut From Firday)

वाचा:

‘पीटीआय’नं ही माहिती दिली आहे. मागील वर्षीच्या लॉकडाऊननंतर राज्यात टप्प्याटप्प्यानं ‘अनलॉक’ करण्यात आलं. मंदिरे, उद्याने, खेळाची मैदाने आणि लोकल ट्रेनही मर्यादित वेळेत सुरू करण्यात आल्या. करोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यानं हळूहळू सगळं सुरळीत होत असतानाच पुन्हा एकदा या साथरोगानं डोकं वर काढलं आहे. राज्यात दिवसाला ६ ते ७ हजार नवे रुग्ण सापडू लागले आहेत.

बदललेल्या परिस्थितीत मुंबई महापालिकेनंही खबरदारी घेणं सुरू केलं आहे. आरोग्य यंत्रणा पुन्हा सुसज्ज करतानाच प्रतिबंधात्मक उपायांवरही भर दिला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना आधीच मनाई केली आहे. मात्र, सार्वजनिक मैदाने, उद्याने अजूनही सुरूच आहेत. महापालिकेनं आता तिकडंही मोर्चा वळवला आहे. त्याचाच भाग म्हणून ओव्हल मैदान खेळ व अन्य कुठल्याही कार्यक्रमांसाठी बंद करण्यात आले आहे. आज संध्याकाळी सात वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

महाराष्ट्रात बुधवारी ८ हजार ८०७ नवे करोना बाधित रुग्ण सापडले. त्यात मुंबईतील १ हजार १६७ नव्या रुग्णांचा समावेश आहे. होम क्वारंटाईन व्यक्तीच्या संख्येतही वाढ झाली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा आकडा १ हजारच्या पुढं गेल्यानं महापालिकेनं विशेष खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here