मालाड पूर्वेला भरदिवसा अज्ञाताने दोन दुकानांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या दोन्ही दुकानांचे मालक आणि त्यांचे कर्मचारी थोडक्यात बचावले. दुपारी दीडच्या सुमारास हा सगळा थरार उपनगरात घडला. खंडणीसाठी हा गोळीबार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळले आहे.
हा गोळीबार तब्बल दहा मिनिटे सुरू होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक गुंड उदय पाठक याचा या गोळीबारामागे हात असण्याची शक्यता आहे. या घटनेत आधी एक बुलेट मेडिकल दुकानाच्या काचेच्या कपाटाला लागली. दुसरी गोळी इमिटेशन ज्वेलरीच्यचा दुकानाच्या मालकाच्या जवळून जाऊन छताला लागली.
एक चेहरा झाकलेला अज्ञात माणूस आधी आनंद मेडिकल अँड बुक सेंटर या दुकानात दीड वाजण्याच्या सुमारास शिरला आणि त्याने गोळीबार केला. त्यावेळी तेथे सुनील सिंह आणि त्याचे तीन कर्मचारी होते. सिंह म्हणाले, ‘त्याने बंदूक रोखली. त्याचे हात थरथरत होते. गोळीबार केल्यानंतर त्याने एक चिठ्ठी माझ्या दिशेने फेकली. त्यात माझ्या भावाचं नाव हिंदीत लिहिलं होतं. त्याने मागितली.’
कुरार पोलीस ठाण्यात यासंबंधीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी आणि त्यांची टीम तपास करत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times