मुंबईः अहमदाबादमधील मोटेरा येथील जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे बुधवारी उद्घाटन झाले. या स्टेडियमचं ‘ स्टेडियम’ असं नामकरण करण्यात आलं आहे. या नामकरणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही केंद्र सरकारला टोला लगावला आहे. संजय राऊत यांच्या टीकेला भाजप नेते यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अहमदाबादमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. त्यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. याप्रकरणी निलेश राणेंनी विरोधकांवर पलटवार केला आहे. तर, संजय राऊत यांनाही प्रत्युत्तर दिलं आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या पहिल्या क्रमांकाचे नेते आहेत. ते मोठेच नेते आहेत. पण संजय राऊत खालच्या कुठल्या क्रमांकाचे नेते आहेत, हे मला माहित नाही. संजय राऊतांनी स्टेडियमच्या नावावरुन टीका केलीये. पण, आक्षेप कोणाचा आहे?, स्टेडियमला मोदींचं नाव देण्यासाठी कोणाचा आक्षेप आहे का?,’ असा सवाल ही निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

वाचाः

‘सुब्रोतो रॉय यांच्या पुण्याच्या स्टेडियमच्या उद्घाटनाला शरद पवार गेले होते, त्यावेळी या स्टेडियमला सुब्रोतो रॉय यांचे नाव होते. मग सुब्रोतो रॉय शरद पवारांपेक्षा मोठे झाले का?. संजय राऊत यांनी पांचट विषय बोलणं बंद करावेत, देशासमोर खूप मोठे प्रश्न आहेत. जर, आक्षेपच नसेल तर पोटात का दुखतंय. आम्ही आमच्या घराला मोदींचं नाव देऊ नाही तर स्टेडियमला. जर तुमचा आक्षेप असेल तर कोर्टात जा, असंही ते म्हणाले आहेत. मुळात, संजय राठोड हे प्रकरण शिवसेनेसाठी अडचणीचं ठरत आहे. त्यामुळं, हे असले विषय काढून विषय दुसरीकडे भरकटवण्याचा प्रयत्न आहे,’ अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here