नागपूर: (corruption) हा व्यवस्थेचाच भाग झाला आहे. भ्रष्टाचाराचा पुरस्कार करणे शक्यच नाही. पोलिस व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या बघता अन्य विभागाच्या तुलनेने लाच प्रकरणात पोलिस विभागात अटक होणाऱ्यांची टक्केवारी ही कमीच आहे, असे धक्कादायक विधान राज्याचे पोलिस महासंचालक () यांनी केले. नगराळे यांच्या विधानाने उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. नागपूर शहर व नागपूर परिक्षेत्रातील कायद व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर नगराळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात नगराळे यांनी सदर विधान केले. ( is part of the system says director general of police hemant nagarale)

महसूल व पोलिस विभागात लाच घेण्याची स्पर्धाच असल्याचे आकडेवारी सांगते, याकडे लक्ष वेधले असता नगराळे म्हणाले, भ्रष्टाचार हा केवळ पोलिस , महसूल व वन विभागातच आहे असे नाही. भ्रष्टाचाराचा नायनाट करणे कठीण आहे. तो व्यवस्थेचाच एक भाग झाला आहे. भ्रष्टाचाराऱ्यांना अटक करून त्यांना शिक्षा करणे हाच एकमेव पर्याय आहे.

भ्रष्टाचार करणारा वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारून भ्रष्टाचार करीत नाही. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याने लाच घेतल्यास वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात येते. तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक लाच प्रकरणात आढळल्यास पोलिस उपायुक्तांची बदली करावी,असे म्हणता येणार आहे. हा आपल्या अख्तेरित्या असलेला प्रश्न आहे. त्यामुळे तो कसा सोडवावा हे मी सार्वजनिकरित्या सांगणे संयुक्तिक होणार नाही. कोरोनामुळे राज्य पोलिस दलातील ३३९ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निधन झाले. अनुकंपातत्त्वावर त्यांच्या पाल्यांना पोलिस विभागात नियुक्ती देण्यात येत आहे. नागपूर पोलिस दलात गुरूवारी ३० पोलिस पाल्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले ,असेही त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा-

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण, पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाचा तपास पुणे पोलिस योग्य दिशेने करीत आहेत. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, एखाद्या गुन्ह्याप्रमाणचे या प्रकरणाचाही तपास सुरू आहे. तपासाबाबत चुकीचा संदेश जाईल,असे कोणतेही विधान करणार नाही. मुंबईतील खासदाराच्या आत्महत्येचा तपासही मुंबई पोलिस योग्यदिशेने करीत आहेत, असेही नगराळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here