राज्यात कोरोनाने पुन्हा उचल खाल्ल्याने राज्य सरकार चिंतेत आहे. अशात यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसे घ्यावे हा प्रश्न राज्य सरकारपुढे होता. मात्र त्यातून मार्ग काढत यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कमी कालावधीसाठी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यात करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष काळजी घेतली जाणार आहे. सभागृहात आमदारांसाठी विशिष्ट अंतर राखत बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. योग्य ते अंतर राखले जावे यासाठी काही आमदारांची बसण्याची व्यवस्था ही अधिकारी कक्ष आणि प्रेक्षक गॅलरीत करण्यात येत आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्र्यांसह आमदार, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांची चाचणी करण्यात येणार आहे. अधिवेशन काळात विधानभवन परिसरात गर्दी होऊ नये यासाठी अभ्यागत आणि आमदारांच्या पीएंना विधानभवनात प्रवेश नाकारण्यात येणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
कोरोनाच्या संकटामुळे मागील पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन देखील कमी कालावधीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र हे अधिवेशन अर्थसकल्पीय असल्याने ते अत्यंत महत्वाचे आहे आणि म्हणून ते पूर्ण काळ चालावे असे विरोधकांना वाटत होते. करोनाचा जोर ओसरल्यामुळे हे शक्य असल्याचे सर्वांनाच वाटत होते. मात्र, अधिवेशनाची वेळ जवळ येत असतानाच राज्यात करोनाने डोके वर काढले. हे पाहता अधिवेशन पूर्ण कालावधीसाठी चालवणे शक्य नसल्याचे सांगत समितीने अधिवेशन १० दिवसांचे केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times