डॉ. प्रकाश आमटे यांना गेल्या ७ दिवसांपासून ताप आणि खोकला होत होता. त्यामळे त्याची परवा करोनाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत RTPCR negative आली. पण असे असले तरी देखील ताप आणि खोकला औषध घेऊनसुद्धा कमी होत नव्हता. त्यानंतर आज चंद्रपूरमध्ये त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली. तेथे सीटी स्कॅन आणि इतर ब्लडटेस्ट चेकअपमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती अनिकेत आमटे यांनी दिलीय.
त्यानंतर तज्ञ डॉक्टरांनी त्याना नागपुरातील रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना धंतोलीतील मोहरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये डॉ. आमटे यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन अनिकेत आमटे यांनी केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
हेमलकसा येथील , आणि पर्यटकांसाठी बंद
करोनाने राज्यात पुन्हा डोके वर काढल्याने हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प, आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्प पर्यटकांसाठी पुढील काही महिने बंद करण्या आले आहेत.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times