म. टा. प्रतिनिधी, पुणे
मध्य रेल्वेने पुणे-सोलापूर इंटरसिटी गाडी (pune solapur intercity train) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-सोलापूर-पुणेदरम्यान धावणारी एक्‍स्प्रेस आठवड्यातून पाच दिवस धावणार आहे. तर, विशेष एक्‍स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. ( has decided to start pune solapur intercity train)

गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून इंटरसिटी गाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. ती आता मान्य झाली आहे. एक मार्चपासून पुणे-सोलापूर एक्‍स्प्रेस दर सोमवार ते शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी पुण्याहून सायंकाळी सहा वाजून १० मिनिटांनी सुटणार असून, सोलापूर येथे रात्री १० वाजता पोहोचणार आहे. तर, सोलापूर-पुणेदरम्यान धावणारी सोलापूरहून सकाळी साडेसहा वाजता सुटणार असून, सकाळी साडेदहाला पुण्यात पोहोचणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-
ही गाडी दौंड आणि कुर्डूवाडी स्थानकांवर थांबणार आहे. यासह १२ मार्चपासून दर सोमवारी आणि शुक्रवारी, नागपूर-कोल्हापूर द्वी साप्ताहिक विशेष गाडी १३ मार्चपासून दर मंगळवारी आणि शनिवारी धावणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here