अहमदाबाद, : भारताने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने या मालिकेत २-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर भारतीय संघ विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. पण तरीही भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत धक्का बसू शकतो.

पाहा कसं असेल समीकरण…भारताने तिसरा सामना जिंकला तर ते मालिका ३-१ अशी खिशात टाकू शकतात. त्याचबरोबर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ते स्थान पटकावू शकतात. तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राहीला तर भारत ही मालिका २-१ अशी जिंकू शकतो आणि कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचू शकतो. पण जर भारताला चौथ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला तर मात्र त्यांना कसोटी स्पर्धेत मोठा धक्का बसू शकतो. कारण भारत जर पराभूत झाला तर ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटेल. त्याचबरोबर इंग्लंड या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाणार नाही. पण भारताने चौथा कसोटी सामना गमावला तर ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत पोहोचेल आणि न्यूझीलंडबरोबर ते अंतिम सामना खेळतील. त्यामुळे भारतीय संघ जर चौथ्या कसोटी सामन्यात पराभूत झाला तर त्यांना कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचता येणार नाही, हे स्पष्ट आहे.

सध्याच्या घडीला दोन विजयांसह भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाची विजयाची टक्केवारी ही सर्वाधिक ७१.० अशी आहे. या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा संघ आहे आणि त्यांची विजयाची टक्केवारी ही ७०.०० टक्के आहे. पण आता न्यूझीलंड एकही कसोटी सामना खेळणार नाही, त्यामुळे त्यांचे या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले आहे.

या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी यावेळी ६९.२ एवढी आहे. त्यामुळे भारताने तिसरा सामना गमावला तर त्यांच्या विजयाची टक्केवारी कमी होणार आणि ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळणार. इंग्लंड आता फायनच्या रेसमधून बाहेर पडला आहे. कारण आता इंग्लंडच्या विजयाची टक्केवारी ही ६४.१ एवढी आहे. त्यामुळे इंग्लंडने भारताला जरी चौथ्या कसोटी सामन्यात पराभूत केले तरी त्यांना विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान पटकावता येणार नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here