म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास महामंडळाकडून (म्हाडा) जाहीर करण्यात आलेल्या ऑनलाइन लॉटरीतील २० टक्के सर्वसामावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत सदनिका मिळालेल्या लाभार्थांकडून नियमाव्यतिरिक्त अन्य शुल्क आकारत आहेत. याबाबत लाभार्थ्यांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत ‘म्हाडा‘ने पिंपळे सौदागर येथील ‘इपिक फेज १’ या गृहनिर्माण संस्थेच्या बांधकाम व्यावसायिकांना अन्य शुल्क आकारू नये, असे आदेश दिले आहेत. ( orders builders not to charge extra fee on beneficiaries)

’म्हाडा’ने २२ जानेवारीला जाहीर केली. २० टक्के सर्वसामावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पिंपळे सौदागर येथील ‘इपिक फेज १’ या गृहनिर्माण संस्थेमध्ये काहींना सदनिका मिळाल्या आहेत. मात्र, संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून नियमाव्यतिरिक्त अन्य शुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ‘म्हाडा’च्या कार्यकारी अभियंता यांनी या गृहनिर्माण संस्थेच्या बांधकाम व्यावसायिकांनी नियमाव्यतिरिक्त अन्य शुल्क घेऊ नये, असे आदेश दिले आहेत.

‘राज्य सरकारच्या २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत विकसकाला २० टक्के अतिरिक्त एफएसआय मिळतो. अतिरिक्त एफएसआयमुळे तयार होणाऱ्या सदनिका या परवडणाऱ्या किंमतीत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत असतात. या सदनिकांच्या किंमती राज्य सरकारच्या २७ फेब्रुवारी २०१८ च्या अधिसूचनेनुसार निश्चित करण्यात येतात. २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेचा उद्देश हा सामान्य नागरिकांना परवडणारी घरे निर्माण करणे हा आहे. त्यासाठी सदनिकेच्या विक्री किमतीत फक्त बांधकामाचा खर्च ग्राह्य धरण्यात आलेला असतो. त्यामुळे लाभार्थ्यांकडून ‘म्हाडा’ने निश्चित केलेली विक्री किमत आणि त्यावरील राज्य सरकारच्या अत्यावश्यक शुल्काशिवाय अन्य शुल्क आकारण्यात येऊ नये. अत्यावश्यक शुल्कामध्ये सोसायटी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे चार्जेस याव्यतिरिक्त अन्य शुल्क घेऊ नये’ असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, ‘म्हाडा‘ने पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधील पाच हजार ६४७ सदनिकांसाठी लॉटरी काढली. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये पाच हजार २१७ सदनिका होत्या. पंतप्रधान आवास योजना, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, ‘म्हाडा’कडून बांधण्यात आलेले प्रकल्प आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत या सदनिका स्वस्त दरात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here