मुंबई: मुंबईत उद्योगपती यांच्या या निवासस्थानाजवळ एका बेवारस कारमध्ये जिलेटिनच्या २० कांड्या आढळून आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू केला आहे. परिसरातील एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्याची पडताळणी केली असता बुधवारी मध्यरात्रीनंतर १ वाजताच्या सुमारास ही येथे उभी करण्यात आली व त्याच्या मागोमाग एक कारही होती, असे स्पष्ट झाले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज तपासात महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. ( )

वाचा:
दक्षिण मुंबईतील या उच्चभ्रू व सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील अशा भागात मुकेश अंबानी यांचे अँटिलिया हे बहुमजली निवासस्थान आहे. या निवासस्थानाला नेहमीच कडेकोट सुरक्षाव्यवस्था असते. असे असताना येथून जवळच्याच रस्त्यावर स्फोटके असलेली कार पार्क केली गेल्याने खळबळ उडाली आहे. ही कार जप्त करून पोलिसांनी तपास सुरू केला असून अंबानी यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी लक्ष घातले असून मुंबई क्राइम ब्रांचमार्फत तपास सुरू करण्यात आला आहे.

वाचा:

आतापर्यंतच्या तपासात महत्त्वपूर्ण तपशील पोलिसांच्या हाती लागला आहे. कारमध्ये एक धमकीचं पत्र आढळलं आहे तसेच काही नंबर प्लेटही आढळल्या आहेत. त्यातील काही नंबर प्लेट अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्यातील नंबर प्लेटशी मॅच होत असल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. अंबानी यांच्या निवासस्थानासमोरील एका दुकानातील सीसीटीव्हीत पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. या फुटेजची पडताळणी केली असता बुधवारी मध्यरात्रीनंतर १ वाजताच्या सुमारास ही कार येथे पार्क करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. स्कॉर्पिओच्या मागे एक इनोव्हा कारही होती. जिथे नो पार्किगचा बोर्ड आहे तिथे स्कॉर्पिओ पार्क करण्यात आली. गाडीतून काही वेळ कुणीही उतरलं नाही. मात्र, लाइट्स बंद करण्यात आल्या. तितक्यात मागे असलेली इनोव्हा पुढे निघून गेली, असे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. हे फुटेज तसेच कारमध्ये आढळलेले पत्र तपासात महत्त्वाचे ठरणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here