राज्यात करोनाच्या चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. हे लक्षात घेता करोना आणि विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन याचा काहीतरी ताळमेळ घालण्याचा प्रयत्न दिसून येत असल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केला. एकाचवेळी अनेक मंत्र्यांना करोना होतो, मग मंत्रालयाचा एक विभाग, उद्या दुसरा विभाग, आज अमरावती तर उद्या यवतमाळ. याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असे दरेकर यांनी म्हटले आहे.
करोनाचा नायनाट झाला पाहिजे. तसेच नागरिकांनीही नियम पाळले पाहिजेत. पण हे कोणत्या नैतिकतेच्या आधारे राज्य सरकार सांगत आहे?… कारण सरकारमधील एक मंत्री ८ ते १० हजार लोकांना एकत्र जमवतो. तेथे ना मास्कचा वापर ना सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले, असे सांगत दरेकर यांनी नाव न घेता वनमंत्री संजय राठोड आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली.
क्लिक करा आणि वाचा-
‘सरकारचा पळ काढण्याचा प्रयत्न आहे’
यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन केवळ १० दिवसांचे असणार आहे. राज्यावर करोनाचे संकट घोंघावत असल्याने कामकाज सल्लागार समितीने हा निर्णय घेतला आहे. यावर मात्र दरेकर यांनी टीकास्त्र सोडले आहे. करोनाची काळजी घेत आपल्याला पूर्णवेळ अधिवेशन चालवता येऊ शकते, मात्र सरकारला पळ काढायचा आहे असे दिसते अशा शब्दांत दरेकर यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times