कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ( mamata banerjee ) या केंद्र सरकार आणि भाजपवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीए. ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी इंधन दरवाढीचा अनोख्या ( fuel price hike ) पद्धतीने निषेध केला. त्यांचा हा अनोखा निषेध चर्चेचा विषय ठरला. पण यादरम्यान ममता बॅनर्जी या ई-स्कूटरवरून पडता पडता वाचल्या.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ई-स्कूटरवरून सचिवालयाकडे निघाल्या. पण रस्त्यात मध्येच त्यांचा स्कूटरवरील तोल गेला. त्यांच्या स्कूटरचा वेग कमी होता. तसंच त्यांच्यासोबत सुरक्षा सरक्षकही होते. यामुळे सुरक्षा रक्षकांनी ममता बॅनर्जींना पडता पडता वाचवलं. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

ममता बॅनर्जींनी तोल सांभाळला. यानंतर त्या मंत्र्यांच्या मागे स्कूटरवर बसून सचिवालयात गेल्या. त्यांनी गळ्यातील फलकाद्वारे केला. भाजपने नोटबंदी केली, इंधन दरवाढ केली. केंद्रातील मोदी सरकारने सर्वकाही विकायला काढलं आहे. बीएसएनएलपासून ते कोळशापर्यंत सर्व विकलं आहे. हे सरकार जनता, तरुण आणि शेतकरी विरोधी आहे. त्यांना पश्चिम बंगालपासून दूर ठेवायचं आहे आणि केंद्रातील सत्तेतूनही हटवायंच आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

पंतप्रधान मोदी दंगलखोर आणि धंदेबाजः ममता

ममता बॅनर्जी यांनी बुधवारी एका जाहीर सभेतून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. मोदी हे देशातील सर्वात मोठे दंगलखोर आणि धंदेबाज आहेत. अमेरिकेत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जे झालं तसंच मोदींसोबतही वाईट होईल. हिंसेने काहीच मिळत नाही, अशी टीका ममतांनी केली. पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा निकाल हा देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारा असेल. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव होईलच, त्यासोबत केंद्रातील सत्तेतूनही ते हद्दपार होतील, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here