वाचा:
करोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी देशमुख यांनी येथे भेट देऊन पाहणी केली; तसेच आरोग्य अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्यामध्ये भविष्यात रुग्णांची संख्या वाढल्यास उपचार आणि आरोग्य सेवा देण्यासाठी मनुष्यबळाची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. याबाबत जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, ‘ससूनमध्ये मनुष्यबळाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासगी एजन्सीमार्फत ही व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय पर्यंत मनुष्यबळ असणार आहे. कंत्राटी पद्धतीने या नेमणुका करण्यात येणार आहेत’.
वाचा:
जिल्ह्यात २१ हॉटस्पॉट
‘जिल्ह्यामध्ये करोनाचे २१ हॉटस्पॉट आहेत. आणि शिक्रापूर नगरपालिकांच्या परिसरात रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यामध्ये ३ हजार ४२२ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. ४ हजार ८३६ नागरिक हे विलगीकरणात आहेत’ असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सुमारे ९५ टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनावरील लस देण्यात आली आहे. ही लस अन्य लशींसारखीच आहे. कोणतीही लस दिल्यानंतर विशिष्ट कालावधी द्यावा लागतो. नागरिकांना ही लस देण्यास सुरुवात झाल्यानंतर संबंधितांनी घाबरू नये, असे डॉ. देशमुख म्हणाले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times