‘प्रत्येक घरातून एक सदस्य पाठवा’
२४ मार्चपर्यंत विविध ठिकाणी सभा घेण्यात येणार आहेत. यानंतर आसाम, कर्नाटक आणि इतर राज्यांमध्येही जाणार आणि आंदोलन करणार. आंदोलनाचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन दीर्घकाळ चालणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी त्यासाठी तयार रहावं. तसंच शेतकरी आंदोलनात प्रत्येक घरातील एका सदस्याने सहभागी व्हावं, असं आवाहन टिकैत यांनी केलं.
शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयारः तोमर
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांसोबत आतापर्यंत १२ वेळा चर्चा केली आहे. सरकार शेतकऱ्यांसोबत कधीही चर्चेस तयार आहे. कृषी कायद्यांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्याने या कायद्यांची अंमलबजावणी करता येणार नाही. तसंच सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी समितीही नेमली आहे. या समितीचा अहवाल अजून आलेला नाही, असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर ( ) म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times