नवी दिल्लीः दोन दिवसांपूर्वीच जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चादरम्यान एका तरुणाने केलेल्या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा जामिया विद्यापीठात गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नसून. विद्यापीठाच्या गेट क्रमांक ५वर गोळीबार करण्यात आला आहे.

सीएए आणि एनआरसी विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापाठीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलने, निदर्शने सुरू आहेत. प्रत्यदर्शींच्या सांगण्यानुसार, स्कुटरवरुन दोन संशयीत व्यक्ती विद्यापीठ परिसरात आल्या होत्या. त्यातील एका व्यक्तीने लाल रंगाचे जॅकेट परिधान केलं होतं. शाहीन बागपासून २ किमी दूर असलेल्या गेटजवळचं गोळीबार झाला आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

दिल्लीत नागरिकत्व कायदा विरोधी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेली गोळीबाराची तिसरी घटना आहे. गुरुवारी रामभक्त गोपाल असे नाव सांगणाऱ्या इसमाने निदर्शकांवर गोळी चालवली होती. त्यात एक विद्यार्थी जखमी झाला होता. तर, शनिवारी शाहीन बाग परिसरात कपिल गुर्जर नावाच्या इसमाने गोळीबार केला होता. या घटनांनंतर दिल्लीतील कायदा-सुव्यवस्थेवरून पोलिसांवर टीका झाली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here