मुंबई: ‘नव्या राजकारणात यांचे महत्त्व संपले आहे, उद्या नेताजी बोसही संपतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वापरही मागच्या निवडणुकीत झालाच होता. आता ‘गरज सरो, पटेल मरो’ हा त्याच नाट्याचा भाग आहे,’ अशी कडवट टीका शिवसेनेनं भाजप व मोदी सरकारवर केली आहे. ( Slams BJP Over Renmaing Sardar Patel Stadium)

गुजरातमधील सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव दिलं गेल्यानंतर देशभर राजकीय टीका-टिप्पणी सुरू आहे. विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून उपरोधिक शब्दांत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ‘मोदी यांचे नाव सरदार पटेलांच्या जागी दिले म्हणून इतके अकांडतांडव करण्याची गरज नाही. हा बदल गुजरातच्या जनतेनं स्वीकारला आहे. पाच महापालिका निवडणुकांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला व भाजप विजयी झाला. सरदार पटेलांपेक्षा मोदी महान झाल्यानंच लोक त्यांना भरभरून मतं देत आहेत. गुजरातलाच सरदार पटेलांविषयी आस्था नसेल तर इतरांनी विरोधाच्या टिपऱ्या का बडवायच्या?,’ असा खोचक सवाल शिवसेनेनं केला आहे.

‘मोदीचं नाव स्टेडियमला दिलं हा टीकेचा विषय होऊ शकत नाही. आक्षेप भारतरत्न सरदार पटेल यांचं नाव बदलण्याला आहे. गुजरातमध्ये आधी सरदार पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला. काँग्रेसनं अपमानित केलेल्या सरदारांचा मानसन्मान, उंची वाढविणारा हा पुतळा आहे. पटेल यांचं नामोनिशाण मिटविण्याचा प्रयत्न काँग्रेस किंवा नेहरू-गांधी घराण्यानं केला, असं गेल्या पाचेक वर्षांत अनेकदा सांगण्यात आलं, पण गुजरातमधील सरदार पटेल स्टेडियमचं नाव बदलून ते मोदी स्टेडियम करावं असं काही सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी सुचविल्याचं दिसत नाही. पटेल यांचं नाव पुसण्याचा प्रयत्न नक्की कोण करीत आहे, ते यानिमित्ताने दिसलं,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा:

‘मोदी (Narendra Modi) हे महान आहेतच. त्याविषयी शंका घेण्याचं कारण नाही, पण मोदी सरदार पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांच्यापेक्षाही महान आहेत असं मोदीभक्तांना वाटत असेल तर त्यास अंधभक्तीची पुढची पायरी मानावी लागेल. मुळात सरदार पटेलांचं नाव काढून मोदीचं नाव लावण्याचा प्रयत्न व खटाटोप ज्यांनी केला त्यांनी पंतप्रधान मोदींना लहान केलं आहे. सरदार पटेलांचे कालपर्यंत गुणगान गाणारे हे लोक एका स्टेडियमच्या नावासाठी सरदारविरोधी होतात, हा निव्वळ व्यापार म्हणावा लागेल,’ अशी टीका शिवसेनेनं हाणला आहे.

वाचा:

‘जे घडले त्यात मोदींचा काही दोष नसावा. मोदी हे फकीर आहेत व कधीही ‘झोला’ उचलून जंगलात किंवा हिमालयात जातील. त्यांचे भक्तच त्यांच्या नावानं हे भलतेसलते उद्योग करीत आहेत. मोदी हे एकदम योग्यासारखे तटस्थ व नम्र असल्यानं ते या उद्योगांकडे थंडपणे पाहतात इतकेच,’ असा चिमटाही अग्रलेखातून काढण्यात आला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here