पालघर तालुक्यातील मनोरजवळील नांदगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अमर जवान पेट्रोल पंपाशेजारील चिकू वाडीलगतच्या नाल्यामध्ये बुधवारी अज्ञात व्यक्तीने सोडल्याची घटना उघडकीस आली आहे. रस्त्याने जाणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना नाल्यामध्ये पडलेल्या प्लास्टिकच्या डब्यात जिवंत सर्प दिसल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत तातडीने माहिती देण्यात आली. घटनास्थळावरून दोन जिवंत आणि दोन मृतावस्थेत असलेले सर्प वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
वाचा:
नांदगाव कार्यक्षेत्रात सर्प सोडल्याची माहिती मनोर वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून घटनास्थळावरून सर्पमित्रांच्या मदतीने दोन जिवंत आणि दोन मृतावस्थेत असलेले सर्प ताब्यात घेण्यात आले होते. यातील जिवंत सर्प अतिविषारी इंडियन कोब्रा आणि मृतावस्थेत असलेला एक सर्प डुरक्या घोणस जातीचा, तर दुसरा कोब्रा असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. जिवंत कोब्रा जातीच्या सापांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच मृत सापांचे शवविच्छेदन केल्यानंतर विल्हेवाट लावण्यात आली. जिवंत सापांना पालघरच्या घाटामध्ये सोडून देण्यात आले. बुधवारी सकाळी नांदगावच्या हद्दीतील नाल्यात सुमारे २० ते २५ प्लास्टिकचे डब्बे आढळून आले. त्यातील चार डब्यांमध्ये सर्प आढळले. उर्वरित डब्यांची झाकणे उघडी असल्याने त्यातील सर्प बाहेर निघून गेले असण्याची शक्यता सर्पमित्रांनी वर्तवली आहे. दरम्यान, सर्प बाळगणाऱ्या व्यक्तीने अंधश्रद्धेतून कर्मकांड करण्यासाठी सर्प बाळगले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times