ही स्फोटकं चेन्नई मंगलापुरम एक्सप्रेस – ०२६८५ मधून हस्तगत करण्यात आली. या प्रकरणात एका महिला प्रवाशाला पोलिसांनी अटक केलीय. ही महिला मूळची तमिळनाडूची रहिवासी असल्याचं समजतंय.
महिला प्रवासी प्रवास करत असलेल्या बाकाच्या खाली स्फोटकं ठेवण्यात आली होती. विहीर खोदण्याच्या उद्देशानं आपण जिलेटीन कांड्या आणल्याची कबुली महिलेनं दिलीय.
उल्लेखनीय म्हणजे, रेल्वेत जिलेटीन कांड्या सापडण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच काल (गुरुवारी) मुंबईतदेखील व्यावसायिक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका गाडीत जिलेटीन कांड्या आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या ‘एन्टेलिया’ इमारतीजवळ स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. या घटनेचा मुंबई क्राईम ब्रान्चकडून अधिक तपास सुरू आहे. या गाडीचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गुरुवारी सायंकाळी ४.०० वाजल्याच्या सुमारास संशयित बेवारस गाडी रस्त्यावर उभी असल्याची सूचना पोलिसांना मिळाली होती. या गाडीची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आल्यावर त्यातून जिलेटीन कांड्या हस्तगत करण्यात आल्या होत्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times