सातारा: जिल्ह्यातील तालुक्यातील शिंदी येथील एका १४ वर्षीय मुलीचा उपचारांअभावी मृत्यू झाला. दोन भोंदूबाबांनी तिला भूतबाधा झाल्याचे सांगितले होते. तंत्र-मंत्र आणि अंगारे धुपारे मांत्रिकांकडून करून घेण्यात आले. वेळेवर उपचार न मिळाल्याने झाला. आईवडिलांनी तिचा मृतदेह परस्पर पुरला. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

येथील परिसरातील शिंदी गावात ही धक्कादायक घटना घडली. अंधश्रद्धेतून १४ वर्षीय मुलीचा बळी गेला आहे. या प्रकरणी निर्मूलन समितीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी भोंदूबाबांना अटक केली.

१४ वर्षीय मुलीला भूतबाधा झाल्याचे भोंदूबाबांनी तिच्या पालकांना सांगितले. तंत्र-मंत्र करून तिला घरी पाठवण्यात आले. तिला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह आईवडिलांनी परस्पर पुरला. ‘अंनिस’ने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघा भोंदूबाबांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीला ताप आला होता. पालकांनी तिला देवऋषाकडे नेले. मुलीला भूतबाधा झाल्याचे देवऋषाने सांगितले. तिला अंगारे-धुपारे करून घरी पाठवले. त्याच रात्री मुलीचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी परस्पर तिचा मृतदेह पुरला. या घटनेची माहिती मिळताच, अंनिसने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघा भोंदूबाबांना अटक केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here