२०२१ हे निवडणुकीचं वर्ष ठरतंय. येत्या काही महिन्यांमध्ये तामिळनाडू, , , ही चार राज्य तर या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा होऊ शकते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये ६ ते ८ टप्प्यांत निवडणुका होऊ शकतात. तर आसाममध्ये तीन टप्प्यांत विधानसभा निवडणूक पार पडू शकते. याशिवाय केरळ, आणि पुदुच्चेरीत एकाच टप्प्यात मतदान पूर्ण होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
पाचही राज्यांच्या मतगणना एकाच दिवशी पार पडेल. १ मे पूर्वी विधानसभा गठनाची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते, असंही म्हटलं जातंय.
४ मे पासून बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं पाच राज्यांमध्ये १ मेपूर्वीच निवडणुका घेण्याचं नियोजन पूर्ण केल्याची शक्यता आहे.
तारखांच्या घोषणांअगोदर निवडणूक आयोगानं या पाचही राज्यांचे दौरे केले आहेत. सध्या एक टीम पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी बंगाल दौऱ्यावर असताना कायदे-व्यवस्थेसंबंधी प्रदेशातील अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त केली होती. यावर मुख्य सचिवांनी त्यांना निवडणुकांपर्यंत कायदे व्यवस्थेची स्थिती नियंत्रणात आणण्याची हमी दिली होती.
करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक घेणं, हेदेखील निवडणूक आयोगासमोरचं सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे. परंतु, करोना प्रोटोकॉल पाळून निवडणुका घेता येऊ शकतात, असंही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times