मुंबई: उद्योगपती आणि रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा यांच्या निवासस्थानाबाहेरील रस्त्यालगत काल, रात्री स्फोटकांनी भरलेली कार आढळून आल्याने खळबळ उडाली होती. क्राइम ब्रँच आणि एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे. त्याचवेळी कारमध्ये बॅग आणि एक धमकीचे पत्र सापडले आहे. मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे.

मुकेश अंबानी यांचे दक्षिण मुंबईतील कंबाला हिल या परिसरात हे बहुमजली निवासस्थान आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात नेहमीच कडेकोट सुरक्षा ठेवली जाते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे आणि सुरक्षा रक्षक तैनात असताना, काल, रात्री अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरील रस्त्यालगत एक कार पार्क करण्यात आली होती. या कारमध्ये स्फोटके असलेली बॅग सापडल्याने खळबळ उडाली. क्राइम ब्रँच आणि एटीएसने तपास सुरू केला. सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.

धमकीच्या पत्रात काय?

या कारमध्ये बॅगेसोबतच एक धमकीचे पत्रही आढळून आले आहे. यात मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना धमकी दिली आहे. ‘ये तो सिर्फ एक ट्रेलर है! नीता भाभी, मुकेश भय्या, ये तो सिर्फ एक झलक है! अगली बार सामान पूरा होकर तुम्हारे पास आएगा और पुरा इंतजाम हो गया है!’ असे या पत्रात म्हटले आहे.

‘मुंबई इंडियन्स’ची बॅग

सूत्रांच्या माहितीनुसार, अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरील रस्त्यालगत कारमध्ये स्फोटके आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा सखोल तपास केला जात आहे. कार अंबानीच्या घराजवळ पार्क करायची होती. पण सुरक्षेच्या कारणास्तव ते होऊ शकले नाही. कारमध्ये बॅगवर मुंबई इंडियन्स असे नाव होते. याच बॅगमध्ये धमकी देणारे पत्र आढळले.

पार्क केलेली कार चोरीची

अंबानींच्या घराबाहेर रस्त्यालगत पार्क केलेली कार ही चोरीची असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच ही कार विक्रोळीतून चोरीला गेली होती, असे तपासात समोर आले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here