अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काल झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. पूजा चव्हाण प्रकरणावरून त्यांनी सरकावर गंभीर आरोप केले. ‘इतके भक्कम पुरावे फार कमी प्रकरणांमध्ये असतात. मात्र, पोलिसांनी अद्याप साधी चौकशी केलेली नाही. गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. कायद्याचं राज्य आहे कुठे?,’ असा सवाल फडणवीस यांनी केला.
वाचा:
पोहरादेवी येथे संजय राठोड यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळं राज्य सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्यामुळं मुख्यमंत्री ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे राठोड यांच्यावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्याबाबत फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या. ‘शरद पवार आणि मुख्यमंत्री नाराज वगैरे काही नाहीत. केवळ बातम्या सोडल्या जातात. नाराजी असती तर आतापर्यंत कारवाई झाली असती. सगळी मिलीजुली सरकार आहे. हे सगळं आशीर्वादानंच सुरू आहे,’ असं फडणवीस म्हणाले.
अनिल देशमुख यांच्यावरही हल्लाबोल
फडणवीस यांनी यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही तोफ डागली. ‘प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री पूजा चव्हाण प्रकरणावर बोलत नाहीत. काय तपास झाला हे सांगत नाहीत. पोलिसांना काहीही विचारत नाहीत. ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचा आहे हे विचारत नाहीत. हे सगळं आश्चर्यकारक आहे,’ असा टोला फडणवीस यांनी हाणला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times