वाचा:
सुभाष देसाई आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी प्रियदर्शिनी उद्यानाला भेट दिली. या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जाणार आहे. स्मारकासाठी उद्यानातील झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी स्पष्ट उत्तरं दिली. ‘एकही झाड न तोडता स्मारकाचे काम केले जाईल,’ अशी ग्वाही त्यांनी दिली.
वाचा:
त्यानंतर पत्रकारांनी वनमंत्री संजय राठोड यांचा विषय काढला. ‘संजय राठोड यांच्यावर कारवाई होणार का? त्यांना पाठीशी घातले जात आहे का? अशा प्रश्नांची सरबत्तीच केली. पत्रकारांच्या या प्रश्नांवर सुभाष देसाई यांनी अक्षरश: हात जोडले आणि काहीही न बोलता ते निघून गेले.
भाजप आक्रमक; अधिवेशन चालू न देण्याचा इशारा
वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजपनं अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन चालू न देण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. त्यामुळं सरकारवर दबाव वाढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील राठोड यांच्या प्रकरणामुळं नाराज आहेत. त्यांनी राठोड यांना स्वत:हून निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळं राठोड हे अधिवेशनाच्या आधीच पायउतार होतील, अशी शक्यता आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times