पोलिसांच्या माहितीनुसार, ज्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या, ती कार काही दिवसांपूर्वी मुंबईतील विक्रोळी परिसरातून चोरी करण्यात आली होती. कारचे चेसीस नंबर पुसण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पोलीस कारच्या मालकापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत.
मुंबई पोलिसांना आतापर्यंत मिळालेली माहितीज्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळल्या, ती कार चोरीचीकाही दिवसांपूर्वीच विक्रोळी परिसरातून कार चोरीलाकारचे चेसीस नंबर पुसण्याचा प्रयत्न, मालकापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यशकार पार्क करणाऱ्या संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत असल्याची माहितीमास्क आणि हुडी घातल्याने ओळख पटली नाहीमुंबईत कार ज्या-ज्या ठिकाणांहून नेण्यात आली आहे, तेथील सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे.
पुरावे मिळाले, आता ती व्यक्ती लागणार हाती
कारचा मालक कोण आहे, याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबईत ज्या-ज्या ठिकाणांहून कार गेली आहे, तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. याआधी कुणीही अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारा कॉल किंवा पत्र पाठवलेले नाही. कारमध्ये मिळालेल्या स्फोटकांच्या बाबत पोलिसांनी सांगितले की, या मिलिट्री ग्रेड जिलेटिन नाहीत. सापडलेल्या जिलेटिन या सर्वसाधारणपणे बांधकाम साइटवर खोदकामासाठी वापरल्या जातात.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times