दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी रोजी कल्याणपुरी येथून एक मुलगी बेपत्ता झाली होती. मुलीच्या कुटुंबीयांनी कल्याणपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
तपास सुरू असतानाच, दिल्ली पोलिसांनी घटनास्थळाजवळून सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी महत्वाचे पुरावे हाती लागले. त्यानंतर आणि मेरठमध्ये छापे मारले. तेथून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मुलीचा मृतदेह मोदीनगरमधून ताब्यात घेतला. मुलीचे अपहरण करून कुटुंबीयांकडून पैसे उकळण्याचा कट होता, असे आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले. मुलीच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. पैसे न मिळाल्याने करून मृतदेह शेतात फेकून दिल्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले. चारही आरोपीची चौकशी करण्यात येत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times