: काँग्रेस महासचिव यांचे पती आणि व्यावसायिक शुकवारी राजस्थानमधील जयपूर शरात दाखल झाले होते. वाड्रा यांनी इथे मोती डुंगरी मंदिरात गणेशाची पूजा केली. देवाकडे आपण सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना केल्याचंही रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं. यावेळी, त्यांनी पत्रकारांच्या काही प्रश्नांना उत्तरंही दिली. निर्माणासाठी गोळा केल्या जाणाऱ्या देणग्यांबद्दल विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं, मी जर एखाद्या चर्चा, मशीद, गुरुद्वारासाठी देणगी दिली असेल तर मी मंदिरासाठीही देणगी देईन… मी या सर्व धार्मिक स्थळांवर जातो, असं उत्तर रॉबर्ट वाड्रा यांनी दिलंय.

यावेळी, त्यांनी राजकारणात सक्रीय होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना रॉबर्ट वाड्रा यांनी योग्य वेळ आल्यानंतर गरज पडली तर मीदेखील सक्रीय राजकारणात सहभागी होईन, असं म्हटलंय.

सक्रीय राजकारणात केव्हा उतरणार?

‘प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ असते. सध्या मी राजकारणापासून दूर राहून मेहनत घेत आहे. जर मला राजकीय लढाई गरजेची वाढली तर त्यावेळी मी राजकारणात नक्कीच सहभागी होईन’ असं रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलंय.

यावेळी, आणि महागाईसारख्या मुद्यावरही रॉबर्ट वाड्रा यांनी भाष्य केलं. सरकारला शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावच लागेल. सरकारनं काही नियम लागू केलं तर त्यांना लोकांशी जोडून घ्यावं लागेल. केंद्र सरकार लोकांवर दबाव टाकू शकत नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.

काही दिवसांपूर्वी दिल्लीत सायकलवरून आपल्या कार्यालयापर्यंत प्रवास करत इंधन दरवाढीचा निषेध नोंदवणारे रॉबर्ट वाड्रा यांनी हे आपलं प्रतिकात्मक पाऊल असल्याचं म्हटलंय. महागाईमुळे लोकांच्या अडचणींत वाढ होत आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here