(अपडेट बातमी वाचण्यासाठी वेबपेज रिफ्रेश करा)
LIVE अपडेटस् :
– सर्व निवडणूक अधिकाऱ्यांचं लसीकरण केलं जाईल
– मतदारांच्या सोईसाठी तब्बल २.७ लाख मतदान केंद्र उभारले जातील.
– यंदाच्या विधानसभा निवडणुकीत १८ कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील
– एकूण ८२४ विधानसभा जागांसाठी मतदान होईल. प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्र हे तळ मजल्यावरच असेल.
– आम्ही सर्व निवडणूक नियोजित राज्यांचा वारंवार दौरा करून आढावा घेतला
– तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे २०२१ रोजी, पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ३० मे २०२१ रोजी तर आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी समाप्त होत आहे.
– काळात अनेक कर्मचारी आणि अधिकारी करोना संक्रमणाच्या जाळ्यात सापडली. त्यातून ते बाहेर पडले आणि जबाबदारी निभावली. अशा अनेक करोना वीरांचा राष्ट्रपतींकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला.
– करोना संक्रमण काळात पार पडलेल्या बिहार निवडणुका यशस्वी ठरल्या. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या संख्येत मतदान केलं : मुख्य निवडणूक आयुक्त
– करोना संक्रमणाचा धोका लक्षात घेऊनच पाच राज्यांत निवडणुका पार पडतील : सुनील अरोडा
– मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी मेडिकल स्टाफसहीत सर्व करोना योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
– राज्य : एकूण मतदार संघ
पश्चिम बंगाल : २९४ मतदार संघ
तमिळनाडू : २३४ मतदार संघ
केरळ : १४० मतदार संघ
आसाम : १२६ मतदार संघ
पुदुच्चेरी : ३० मतदार संघ
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times