कोविडचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने जी नियमावली आखून दिली आहे, त्या नियमांचे काटेकोर पालन करून मनसेने ‘मराठी भाषा दिन’ हा कार्यक्रम आयोजित केला होता, असे अमेय खोपकर यांनी सरकारवर टीकास्त्र सोडताना म्हटले आहे. सरकारने या कार्यक्रमाला कोविड प्रसाराचं कारण देत परवानगी तर नाकारलीच, वर कारवाईचा धाक दाखवला, असे सांगत ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत अशा संजय राठोड यांच्यासारख्या मंत्र्याचे समर्थन लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करतात, अशा गर्दीवर कारवाई करण्याची ज्यांच्यात धमक नाही, त्यांच्या डोळ्यात मराठी भाषा दिन का खुपतो?, असा सवाल खोपकर यांनी सरकारला विचारला आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘आमचा कार्यक्रम आम्ही करणारच’
महाबिघाडी सरकारचे डोके ठिकाणावर नाही यावर शिक्कामोर्तब झाले असून यापुढे जाऊन आता शंका यायला लागली आहे की, हे सरकारच अमराठी आहे की काय?, असा सवाल उपस्थित करत खोपकर यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. आमचा नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणारच असे आम्ही ठणकावून सांगत असल्याचेही खोपकर यांनी सरकारला बजावून सांगितले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times