नवी दिल्ली:
काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना सायंकाळी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हेदेखील रुग्णालयात पोहोचले आहेत.

सोनिया गांधी यांच्या एका निकटवर्तीयाने सांगितले की सोनिया यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांनी सायंकाळी सात वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत.

सोनिया गांधी यांना नियमित आरोग्य तपासणीकरिता रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती मिळत आहे. ७३ वर्षीय सोनिया गांधी गेली काही वर्षे आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत. त्यामुळेच त्यांनी राजकारणात सक्रीय राहणंही आधीपेक्षा खूप कमी केलं आहे. त्या निवडणूक प्रचारसभांनाही फारच अपवादाने जातात. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले आणि सोनियांवर पुन्हा एकदा पक्षनेतृत्वाची जबाबदारी आली. सोनिया यांनी सर्वाधिक काळ काँग्रेसचं अध्यक्षपद भूषविलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here