अहमदनगर: वीज वितरण कंपनीकडून सुरू असलेल्या वीज बिल थकबाकीच्या प्रश्नावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे. लॉकडाऊनच्या काळात आलेल्या अवाजवी बिलांची सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. ‘ग्राहकांना जेवढा त्रास तुम्ही देणार तेवढा आमच्याकडून देखील तुम्हाला होणार,’ असा इशाराच मनसेने वीज अधिकाऱ्यांना दिला आहे.

वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी सध्या वीज कंपनीतर्फे मोहीम सुरू आहे. शहरात थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे तर ग्रामीण भागात कृषी पंपांची थकबाकी वसूल करण्यासाठी डीपीच बंद केले जात आहेत. या पार्श्वभूमिवर मनविसेनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेतर्फे अधिकाऱ्यांना भेटून लेखी निवेदनाद्वारे हा इशारा देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्य सुमित वर्मा, अनिकेत शियाळ, तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड, सनी वैराळ, प्रमोद ठाकूर, आदेश गायकवाड, बजरंग रणसिंग, संतोष गवते यावेळी उपस्थित होते.

वाचा:

निवेदनात म्हटले आहे की, ‘महावितरणचे ‘वसुलीभाई’ ज्या प्रकारे लोकांकडून सक्तीची विजबिले वसूल करत आहेत तो थुकरटपणा तत्काळ थांबवा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पध्दतीने कार्यक्रम हाती घेईल. लोकांच्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नका. लॉकडाऊनचे ३ ते ४ महिने सर्व बंद होते. ज्यांचे रोजच्या कमाईवर सर्वकाही अवलंवून असते, अशा लोकांना सध्या हाल झाले आहेत. त्यांचे व्यवसायिक, घरगुती लाईटबील अव्वाच्या सव्वा आलेले आहे. क्लासेस, नर्सरी, प्लेग्रुप हे तर अजूनही सुरळीत सुरू झालेले नाहीत. मात्र, आपल्या लोकांकडून बळजबरीने त्यांच्याकडूनही वसुली करण्यात येत आहे. यातून मार्ग काढण्याचे कोणतेही पाऊल आपल्याकडून उचलले गेल्याचे दिसत नाही. आपल्यामुळे लोकांना होणारा त्रास खूप आहे. ग्राहकांना जेवढा त्रास तुम्ही देणार तेवढा आमच्याकडून देखील तुम्हाला होणार, याची नोंद घ्यावी. उर्जामंत्री खोटी आश्वासने घेऊन मिरवतात. पण सर्वसामान्य जनतेचा विचार कोणीही करताना दिसत नाही.

लोकांना लॉकडाऊनच्या झळा अजूनही बसत आहेत. त्या तीन महिन्यांची नुकसान भरपाई होणार तर नाहीच उलट त्याचा त्रास नाहक सहन करावा कशासाठी? आपण तात्काळ ही “तोडा-तोडी’ थांबवावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विदयार्थी सेना आपल्या कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करेल. ज्या लोकांना खोटी विजबिले दिली, अंदाजे बिले दिली, त्यांना दुरुस्तीसाठी रक्कम भरायला लावणे खपवून घेतले जाणार नाही. त्यात तुम्ही जे सावकारी व्याज लावत आहात यावरही मनसेचा आक्षेप आहे. आपण हे सर्व लक्षात घेऊन जनेतेला त्रासातून मुक्त करावे, अन्यथा येत्या आठ दिवसांत आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा देण्यात आला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here