वाचा:
राज ठाकरे यांनी आपल्या पत्राची सुरुवात कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळींनी केली आहे. ‘आसवं गाळत बसावी इतकी आपली मराठी भाषा लेचीपेची नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळकांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ती मातृभाषा आहे. लतादीदींच्या व आशाताईंच्या गोड गळ्यातून याच भाषेतील पहिले शब्द निघाले. त्यामुळं ह्या भाषेची ताकद आपण समजून घ्यायला हवी. ह्याच मराठी भाषेनं हिंदवी स्वराज्याचा, स्वराज्याचा, प्रबोधनाचा, श्रमिक एकजुटीचा विचार दिला. त्यामुळं तिची चिंता सोडून अभिमान बाळगायला हवा,’ असं राज यांनी म्हटलं आहे.
मनसेमुळेच…
मराठी भाषेसाठी मनसेनं केलेल्या कार्याचीही त्यांनी आठवण करून दिली आहे. ‘सरकारी कॅलेंडरमधील अनेक दिवस जसे निरसपणे साजरे केले जाता, तसाच हा दिवसही साजरा केला जात होता. मात्र, मनसेनं हा दिवस मोठ्या उत्साहानं साजरा करायला सुरुवात केल्यावर मराठी भाषेचा गौरव करणारा हा दिवस सर्वांच्या स्मरणात राहू लागला. ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे,’ असंही राज यांनी म्हटलं आहे.
मनसेच्या शाखांमध्ये फलक
मराठी माणसांना मराठीतून स्वाक्षरीची सुरुवात करता यावी म्हणून मनसेच्या शाखा-शाखांमध्ये फलक लावण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी सहकुटुंब जाऊन मराठीत स्वाक्षरी करा आणि मराठी भाषा अधिक मोठी करण्याची प्रतिज्ञा करा, असं सांगत, राज यांनी सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times