मुंबईः रिलायन्स उद्योग समूहाचे मालक यांच्या दक्षिण मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाजवळ गुरुवारी दुपारी स्फोटकांनी भरलेली कार सापडल्यानं एकच खळबळ उडाली होतीय. या घटनेनंतर अंबानी यांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तसंच, या प्रकरणाचा कसून तपासही सुरु आहे. या सगळ्या घडामोडींवर अंबानी कुटुंबियांनी प्रतिक्रिया देत मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने एक पत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये पोलिसांचे आभार मानले आहेत. ‘मुंबई पोलिसांनी तातडीने आणि जलद गतीने निर्णय घेत केलेल्या कारवाईबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्हाला विश्वास आहे की या प्रकरणामध्ये पोलीस लवकरच वेगाने त्यांचा तपास पूर्ण करतील,’ असं रिलायन्स इंटस्ट्रीजने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ या निवासस्थानाजवळ गुरुवारी दुपारी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली. या कारमध्ये जिलेटीनच्या २५ ते ३०कांड्या सापडल्या होत्या.

अँटेलियापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर विजय स्टोअरच्या समोरच्या पदपथावर एक हिरव्या रंगाची कार बेवारस स्थितीत आढळली. या कारबाबत सर्वप्रथम अँटिलियाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना संशय आला. याबाबतची माहिती मिळताच मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर एटीएस, बॉम्बशोधक नाशक पथक घटनास्थळी पोहोचले. तिथे कारमध्ये जिलेटिनच्या सुमारे २५ ते ३० कांड्या सापडल्या. कारमध्ये एक पत्र सापडले असून यामध्ये ‘यह तो खाली ट्रेलर है’ अशा शब्दांत धमकी दिली आहे. कारची तपासणी करताना पोलिसांना आतमध्ये दहा ते बारा नंबर प्लेटसही सापडल्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here