याचे एक उदाहरण म्हणजे मुंबईच्या एका लोकलमध्ये एक प्रवासी चक्क मास्क नाक आणि तोंडाला बांधण्याऐवजी तो डोळ्यांना बांधून झोप काढत असल्याचे आढळले आहे. डोळ्यावर मास्क बांधून झोप काढतानाचा या बेजबाबदार प्रवाशाचा फोटो दुसऱ्या प्रवाशाने काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो युवक काँग्रेसचे अध्यक्ष (Satyajeet Tambe) यांनी ट्विट केला आहे. ‘काय चूक आहे त्या बिचाऱ्या करोना व्हायरसची?’, असे कॅप्शन या फोटोला तांबे यांनी दिले आहे आणि खाली जुगाड असा हॅशटॅग लिहिला आहे. तांबे यांचे हे ट्विट राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री (vijay Vadettiwar) यांनी रिट्विट करत असे वागणाऱ्या लोकांना आवाहन केले आहे.
वडेट्टीवार ट्विटमध्ये म्हणतात, ‘मित्रांनो, असे बेजबाबदार वागू नका! मास्कचा योग्य वापर करा कमीत कमी स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकरिता.’
क्लिक करा आणि वाचा-
राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून करोना रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. सरकार कितीही उपाययोजना करत असले तरी त्याचा परिणाम कसा दिसेल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे राज्य आता लॉकडाउनच्या उंबरठ्यावर आहे, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत देखील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून लोकमधील गर्दी कमी करणे आवश्यक असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. करोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी लोकलच्या फेऱ्या कमी करता येतील का, याचाही विचार केला जात असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times