लातूर: राज्यात संसर्गाचे रुग्ण वाढत असताना व काही जिल्ह्यांत लावण्याची वेळ आली असताना लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र जनता कर्फ्यूचे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यामध्ये उद्या शनिवार आणि परवा रविवार असे दोन दिवस पाळण्यात यावा. यासाठी कुणावरही सक्ती असणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. ( )

वाचा:

लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आधीच शनिवार (२७ फेब्रुवारी) व रविवारी (२८ फेब्रुवारी) असे दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. आज पुन्हा एकदा त्यांनी सोशल माध्यमातून जनता कर्फ्यूबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. अन्य जिल्ह्यांत करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असले तरी लातूरमधील परिस्थिती तशी नाही. लातूरमध्ये आज तरी स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, खबरदारी व करोनाची साखळी तोडण्यासाठी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

वाचा:

लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी स्वत:हून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू पाळावा. अत्यावश्यक काम नसेल तर घराबाहेर पडू नये. जिल्हा प्रशासन वा पोलिसांकडून जनता कर्फ्यूसाठी कोणतीही सक्ती केली जाणार नाही. हा निर्णय केवळ जनतेच्या हिताचा असल्याने त्यांनीच त्याचे पालन करून उदाहरण घालून द्यावे, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आवाहनात केली आहे.

वाचा:

लातूर जिल्ह्यात सध्या ५३२ अॅक्टिव्ह रुग्ण

राज्यातील काही भागांत करोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर व अन्य जिल्ह्यांत गेले काही दिवस करोनाने थैमान घातले आहे. मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्यातही दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तुलनेत लातूरमध्ये स्थिती तितकी गंभीर नाही. लातूरमध्ये सध्या करोनाचे ५३२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २५ हजार ४३९ बाधित आढळले असून त्यातील २४ हजार १९८ रुग्ण बरे झाले आहेत तर ७०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी लातूर जिल्ह्यात ८० नवीन रुग्णांची भर पडली होती तर दोन रुग्ण दगावले होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here