विदर्भात करोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी. नागपूर, अमरावती या जिल्ह्यांत निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. तर, मंगल कार्यालयांबाबतही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी दोन दिवसांचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (२७ फेब्रुवारी) संध्याकाळी पाच ते सोमवार (१ मार्च) सकाळी ९पर्यंत कर्फ्यू असणार आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
वाचाः
दरम्यान, महाराष्ट्र अनलॉक होत असातानाच राज्यातील काही जिल्ह्यांत पुन्हा करोनानं डोकं वर काढलं आहे. करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनानंही कंबर कसली आहे. विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अकोला, अमरावतीत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहे. नागपूरमध्येही सर्व शाळा, महाविद्यालये कोचिंग क्लास ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वाचाः
दरम्यान, लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही जनता कर्फ्यूचे पाऊल उचलले आहे.
जिल्ह्यामध्ये उद्या शनिवार आणि परवा रविवार असे दोन दिवस
पाळण्यात यावा. यासाठी कुणावरही सक्ती असणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times