नवी दिल्ली: अनिवासी भारतीयांनी विदेशात पैसा कमावल्यावर त्यांना भारतात कर भरावा लागणार असल्याची चर्चा होती. त्यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. एखाद्या अनिवासी भारतीयाने भारताचं मानद नागरिकत्व स्विकारल्यास त्याने परदेशात कमावलेल्या पैशावर भारतात कर लागू केला जाणार नाही. त्याने भारतात व्यवसाय किंवा नोकरी करून पैसा कमावला असेल तरच त्याच्याकडून कर वसूल केला जाईल, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

काल संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी आर्थिक विधेयक २०२० मध्ये अनिवासी भारतीयांकडून वसूल करण्यात येणाऱ्या कराबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कोणत्याही देशाच्या अधिकार क्षेत्रात कर लागू करण्यास बंधनकारक नसलेला कोणत्याही भारतीय नागरिकांना भारताचा निवासी मानला जाईल. कोणीही कर चुकवेगिरी करू नये म्हणून ही तरतूद करणअयात आली आहे. भारतातील कर चुकवण्यासाठी काही लोक कमी कर भराव्या लागणाऱ्या देशात जाऊन राहत असल्यानेच हा नियम लागू करण्यात आल्याचं केंद्र सरकारने या प्रस्तावात म्हटलं आहे.

प्रवासाच्या निमित्ताने इतर देशात गेलेला किंवा एखाद्या देशात घर आहे म्हणून कोणताही भारतीय नागरिक कोणत्याही देशात कर देण्यास पात्र ठरणार नाही. तो भारताचा नागरिक असल्याने त्याला भारतीयच मानलं जाईल. त्यामुळे त्याने विदेशात जरी कमाई केली असली तरी त्याला भारतात कर भरावा लागेल, असं केंद्राने म्हटलं आहे.

इतर देशात कायदेशीररित्या कार्य करत असलेल्या भारतीयांना कर संरचनेत आणण्याचा नव्या तरतूदीचा हेतू नाही. जे भारतीय मध्य-पूर्वेतील देशात कामगार म्हणून कार्यरत आहेत, पण तिथे त्यांना कर लागू नाही, अशा भारतीयांना त्यांनी भारतात मिळविलेल्या उत्पन्नावर कर घेण्याची तरतूद करण्यात आली आहे, अशी करण्यात आलेली व्याख्या चुकीची असल्याचंही केंद्रानं म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here