मुंबई: राज्यातील () बाधित रुग्णांची झपाट्याने होणारी वाढ कायम असून आज दिवसभरातील रुग्णवाढीचा आकडा कालच्या तुलनेत केवळ ३६९ ने कमी आहे. आज दिवसभरात तब्बल ८ हजार ३३३ इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ८ हजार ७०२ इतकी होती. तर, आज ४ हजार ९३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार ७४४ इतकी होती. (maharashtra registers 8333 new covid 19 cases 4936 recoveries and 48 deaths in the last 24-hours)

या बरोबरच राज्यात दिवसाला मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णसंख्येत कालच्या तुलेनेत घट झाली आहे. आज राज्यात एकूण ४८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ५६ इतकी होती. आजची मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सध्या राज्यातील मृत्यूदर २.४३ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख १७ हजार ३०३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३५ टक्के इतके झाले आहे.

तसेच राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६१ लाख १२ हजार ५१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ३८ हजार १५४ नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे प्रमाण १३.२७ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ३ लाख १८ हजार ७०७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर २ हजार ६८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

सर्वात जास्त सक्रिय रुग्ण पुण्यात

राज्यात कालच्या तुलनेत अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढून ती आज एकूण ६७ हजार ६०८ इतकी झाली आहे. राज्यातील प्रमुख शहरांचा विचार केल्यास मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती ७ हजार ८९९ इतकी झाली आहे. तर ठाण्यात ही संख्या ७ हजार २७६ इतकी. तर, पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार ५७७, नाशिक येथे २,१८५, अहमदनगर येथे १,००१, औरंगाबाद येथे २,०५२, नागपूर येथे ९ हजार १४१, कोल्हापूर येथे २४० इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्णसंख्या पुण्यात असून सर्वात कमी रुग्णसंख्या गडचिरोली आहे. येथे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९७ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here