वाचा:
ही स्फोटके तयार करणारी जगातील चौथ्या क्रमांकाची कंपनी असून ती नागपुरात आहे. विहीर खोदणे आणि खाण कामासाठी ही स्फोटके प्रामुख्याने पुरवली जातात. गुरुवारी रात्री मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिन स्फोटकाच्या कांड्या सापडल्या होत्या. या कांड्या नागपुरातील सोलर एक्स्पोझिव्ह येथे तयार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
वाचा:
यासंदर्भात कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. केंद्र सरकारच्या नियम आणि दिशानिर्देशानुसार कंपनीत स्फोटके तयार केली जातात. त्यांची माहिती केंद्र सरकारच्या स्फोटके मुख्य नियंत्रकांना (पेसो) आणि पोलीस प्रशासनाला दिली जाते. स्फोटके ऑनलाइन पद्धतीने खरेदी करायची असल्यास संबंधिताकडून एक अर्ज भरून घेतला जातो. स्फोटके नियंत्रक कार्यालयातून मंजुरी मिळाल्यानंतरच त्यांची विक्री होते. त्याचीही माहिती स्फोटके नियंत्रक व पोलीस विभागाला पुरविली जाते. स्फोटकांच्या उत्पादन आणि विक्री यासंदर्भातील सर्व माहिती पोलीस व स्फोटक नियंत्रकांकडे उपलब्ध असते. तसेच प्रत्येक २५ किलोंच्या बॉक्सवर बारकोड असतो. त्यावरून त्याच्या मुळापर्यंत पोहोचता येते. पण, त्यातून उघडून वापरण्यात आलेल्या कांड्यांवर अद्याप बारकोड करण्यात येत नाहीत. जिलेटीनच्या खुल्या कांड्यांवर बारकोड असावे, अशी प्रक्रिया केंद्र सरकार करीत आहे. जिलेटीनच्या खुल्या कांड्यांचा डिटोनेटर्सशिवाय स्फोट होऊ शकत नाही. कांड्या कापणे, फेकणे किंवा जाळल्यानेही स्फोट होत नाही, असे नुवाल म्हणाले.
वाचा:
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी तपास करत आहे. त्याबाबत विचारले असता या प्रकरणात मुंबई पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times