केंद्रीय मंत्री (Nitin Gadkari) यांच्या लोकसभा निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेतील सगळेच आरोप निराधार नाहीत, त्यावर विस्तृत सुनावणी होणे आवश्यक असल्याचे मत नोंदवित ही याचिका रद्द करण्याचा गडकरींचा अर्ज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने () फेटाळून लावला आहे. (not all the allegations in union minister ‘s petition are baseless says court)
गडकरींनी २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी खोटे शपथपत्र सादर केल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. गडकरींनी या शपथपत्रात त्यांच्या संपत्ती व मिळकतीबाबत दिलेली माहिती चुकीची आहे. यामुळे त्यांनी मतदांरांना चुकीची व खोटी माहिती देऊन ही निवडणूक जिंकली असा दावा या याचिकेद्वारे करण्यात आला आहे. त्यावर ही याचिका रद्द करण्यात यावी, असा अर्ज गडकरींनी त्यांचे वकील वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर आणि अॅड. देवेन चौहान यांच्यामार्फत केला होता.
क्लिक करा आणि वाचा-
अॅड. श्रीधर पुरोहित यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर न्यायालयाने ही याचिका रद्द करण्यास नकार दिला.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times