वाचा:
ठाण्यांतर्गत घडलेल्या जमिनीच्या अनियमिततेप्रकरणी आरोपी याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ही याचिका न्या. देव यांच्या खंडपीठासमक्ष विचाराधीन होती. शुक्रवारी याप्रकरणी सुनावणी अपेक्षित होती. याप्रकरणाशी निगडीत एका व्यक्तीने न्यायमूर्तींशी परिचित असलेल्या एका दुसऱ्या व्यक्तीला या याचिकेचा क्रमांक पाठविला तसेच एक संदेशसुद्धा पाठविला. या व्यक्तीने हा मेसेज थेट न्यायमूर्तींच्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर पाठविला. याप्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जामीन दिला जाऊ नये, या आशयाचा हा मेसेज होता. शुक्रवारी या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्या. रोहित देव यांनी या घटनेचा उल्लेख केला व याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.
वाचा:
न्या. रोहित देव यांनी दिलेल्या आदेशानुसार, त्यांना मेसेज पाठविणारी व्यक्ती ही एक गृहिणी आहे. तिला कदाचित याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले नसेल. मात्र, या महिलेला हाताशी धरून हा प्रकार कुणी केला आहे का? हे समोर येणे गरजेचे असून त्यासाठी या प्रकाराची चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत न्यायमूर्तींनी नोंदवले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times