मुंबई: दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या अवघ्या ६ महिन्यांची चिमुरडी हिला आज अमेरिकेहून मागवण्यात आलेले औषध देण्यात आले. आता लवकरच बरी होणार आहे. जीन रिप्लेसमेंट उपचारांत हे औषध अतिशय महत्वाचे मानले जाते. ‘’ असे या औषधाचे नाव आहे. तीरा सध्या माहिमच्या पी. डी. हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत आहे. तीराला शनिवार, २७ फेब्रुवारी रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. (the child has given medicine worth rs 16 crore today)

गेल्या काही दिवसांपासून तीरावर उपचार करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत होते. कोट्यवधीच्या या औषधावरील सीमा शुल्कही केंद्र सरकारने माफ करण्याचा निर्णय घेतला होता. देशभरातून तीराला लवकर औषध मिळावे आणि ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जात होती. मात्र, अखेर तो दिन उगवला आणि तीरा ते औषध देण्यात आले. आता तीरा लवकर बरी होईल अशी आशा तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही व्यक्त केली आहे.

‘ते’ औषध गुरुवारी मुंबईत पोहोचले

तीरासाठी अतिशय महत्वाचे असलेले ते औषध गुरुवारी, २५ फेब्रुवारी रोजी अमेरिकेतून मुंबईतील रुग्णालयात पोहचले. हिंदुजा रुग्णालयाकडे हे औषध देण्याचा परवाना आहे. तीराला हे औषध सलाईनमधून देण्यात आले. आता एक दिवस तिला रुग्णालयात ठेवण्यात येईल आणि उद्या, शनिवारी तिला घरी सोडण्यात येईल.

हे अतिशय महागडे औषध मिळवणारी तीरा हे मुंबईतील दुसरे बाळ ठरले आहे. मुंबईत काही महिन्यांपूर्वी हे औषध एका बाळाला देण्यात आले होते. मात्र देशात आतापर्यंत एकूण ११ बालकांना हे औषध देण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

तीराला नेमका कोणता आजार आहे?

तीरा कामत हिला (एसएमए) हा दुर्मीळ आणि दुर्धर आजार झाला आहे.या दुर्मीळ आजारामध्ये, प्रोटीन तयार करण्यासाठी शरीरामध्ये जो जीन असणे अपेक्षित असते, तो नसल्याने गुंतागुंत निर्माण होते. या स्थितीमध्ये मज्जातंतू आणि स्नायू बळकटीकरणाची प्रक्रिया अतिशय मंदावते. परिणामी अन्न गिळणे, श्वास घेणे अवघड होते. तसेच इतर हालचालींवरही अनेक बंधने येतात. ही परिस्थिती टप्प्याटप्याने अधिक गुंतागुंतीची होत जाते. त्यामुळे या बाळाच्या शरीरातील जीनमध्ये प्रोटीन तयार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांची जीन थेरपी देणे आवश्यक असते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here