म. टा. खास प्रतिनिधी,

वरळी सीफेसवरील (worli seaface) बंगल्यात राहणाऱ्या या एका वृध्द महिलेची हत्या (murder of an elderly woman) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विषणी डोलवानी असे या महिलेचे नाव असून गुरुवारी रात्री त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( in a bungalow on in mumbai)

वरळी सी फेस येथील प्रसन्न कुटीर या बंगल्यात पती, मुलगा, सुन यांच्यासोबत विषणी डोलवानी राहत होत्या. गुरुवारी रात्री विषणी या तळ मजल्यावर टीव्ही पाहत बसल्या होत्या. तर पहिल्या मजल्यावर त्याचा मुलगा झोपण्यासाठी गेला होता. बंगल्यातील सुरक्षारक्षकाने मध्यरात्री विषणी यांच्या मुलाला फोन केला. घरात कामाला असलेला नोकर अद्याप आलेला नसल्याचे त्याने सांगितले. काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आल्याने विषणी यांचा मुलगा खाली आला असता आईचे हातपाय बांधून त्याच्या तोंडात बोळा कोंबून ठेवल्याचे त्याने पाहिले.

क्लिक करा आणि वाचा-

याबाबत त्याने पोलिसांना कळविले. वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विषणी यांना जवळच्या रूग्णालयात नेले. मात्र दाखल करण्यापूर्वीच डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर नोकर फरार असून त्यानेच ही हत्या केल्याचा संशय आहे. वरळी पोलिस या नोकराचा शोध घेत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here