एकाच जिल्ह्यात दोन ते तीन टप्प्यांत जाणीवपूर्वक निवडणुका का घेतल्या आहेत. हे सर्व भाजपने जाणूनबुजून केलं आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्याचा उल्लेख त्यांनी केला. तृणमूल काँग्रेस तिथे मजबूत स्थितीत आहे म्हणूनच तिथे तीन टप्प्यांत मतदान घेतले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री आपल्या सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप ममतांनी केला आहे. पण, बंगालची जनता भाजपला प्रत्युत्तर देईल. राजकीय डावपेच सुरूच आहे, आम्हीही ते खेळू आणि जिंकू. बंगालमध्ये फक्त बंगालीच राज्य करतील, असा दावा ममतांनी केला.
केंद्र सरकार निवडणुकीत आपली शक्ती वापरु शकत नाही. आम्ही आमची लढाई लढू असं म्हणत ममतांनी पंतप्रधान मोदींवरही हल्ला चढवला. तुम्ही पंतप्रधान म्हणून आपली ताकद वापरू शकता, पण भाजप नेते म्हणून तिचा वापर करू नका. आपण जर बंगालला दडपून टाकाल असे आपल्याला वाटत असेल तर आम्ही हे होऊ देणार नाही. आम्ही काही फरारी नाही, आम्ही तळागाळातील माणसं आहोत. आम्हाला इथली स्थानिक स्थिती पूर्ण माहिती आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
पश्चिम बंगालमध्ये नेहमीच अनेक टप्प्यांमध्ये मतदान होत असते. २०१६ मध्ये बंगालमध्ये ७ टप्प्यांत मतदान झाले होते.
पश्चिम बंगाल भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांचे स्वागत केले. राज्यात शांततेत निवडणुका होतील घ्याव्यात. यासाठी राज्यात आपण अतिरिक्त सुरक्षेसह अतिरिक्त अधिकारीही नियुक्त केले पाहिजेत जेणेकरुन जनता निर्भयपणे मतदान करू शकेल, असं कैलास विजयवर्गीय म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जोरदार लढत देईल. विजयी होण्यासाठी काँग्रेस पूर्ण प्रयत्न करेल, असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times