कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध यापुढेही लागू राहतील. करनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे कठोरपणे पालन करावे. तसंच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सहायक ठरणाऱ्या व्यवहारांना प्रोत्साहन द्यावे आणि परवानगी दिलेल्या व्यवहारांसंबंधी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे प्रामाणिकपणे पालन केले जावे. यासाठी २७ जानेवारीलाला जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना आणि एसओपी काटेकोरपणे लागू होतील यावर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी भर दिला पाहिजे, असं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, देखरेख ठेवण्यासाठी आणि सतर्कता बाळगण्यासाठी गृहमंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा कालावधी वाढवण्यात आला असून आता त्या ३१ मार्चपर्यंत लागू राहतील, असं गृहमांभाने शुक्रवारी जारी केलेल्या एका आदेशात म्हटलं आहे. सरकारने चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने चावलण्यास आणि स्विमिंग पूलमध्येही सर्वांना परवानगी दिलेली आहे. तसंच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा राज्यांतर्गत वाहतुकीस परवानगी आहे. कुठेही जाण्यासाठी ई पासचे बंध किंवा परवानगीची अट नाही. कन्टेन्मेंट झोन वगळता इतर भागात सर्व व्यवहारांना परवानगी असेल. पण दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार.
सामाजिक, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी ५० टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. पण या कार्यक्रमांमध्ये सोशल डीस्टन्सिंग आणि मास्कसह सर्व करोनाच्या सूचनांचं पालन करावं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times