नवी दिल्लीः कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर-दक्षिण भारतीयांबद्दल केलेल्या टीपणीवरून राजकारण रंगलं आहे. आता पक्षाचे उत्तर भारतातील काही ज्येष्ठ नेतेही यावर नाराज ( ) आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांची जम्मूत आज बैठक होत आहे. हे नेते पक्ष नेतृत्वाला आणि गांधी घराणाऱ्याला कठोर संदेश ( ) देऊ शकतात.

जम्मूमध्ये शनिवारी कॉंग्रेसच्या जी २३ गटाची बैठक होत आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या घरी ही बैठक होण्याची शक्यता आहे. कपिल सिब्बल, आनंद शर्मा, राज बब्बर हे रात्रीच दाखल झाले आहेत. इतर काही नेते सकाळी येण्याची शक्यता आहे. पक्षातल्या लोकशाही व्यवस्थेवर हे नेते चर्चा करतील, अशी शक्यता आहे.

राहुल गांधी आज तामिळनाडूच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या दरम्यान कॉंग्रेसचे २३ नेते जम्मूमध्ये आपलं शक्तिप्रदर्शन करतील. जम्मूमध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा, कपिल सिब्बल, राज बब्बर, विवेक तन्खा आणि गुलाम नबी आझाद हे एका कार्यक्रमात संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात मनीष तिवारीही सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

‘राहुल गांधींना स्पष्ट संदेश…’

या बैठकीतून राहुल गांधींसाठी एक संदेश आहे. उत्तर आणि दक्षिण भारत एक आहे, हे आम्हाला देशाला दाखवायचे आहे. कॉंग्रेसमध्ये सध्या जे काही घडत आहे ते गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या कॉंग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीत झालेल्या कराराचं स्पष्ट उल्लंघन आहे. आतापर्यंत पक्षात सुधारणा किंवा निवडणुका घेण्याची कुठलेही चिन्हे दिसत नाहीएत, असं यातील काही नेत्यांनी सांगितल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

‘गुलाम नबी आझाद यांचा सन्मान केला नाही’

गुलाम नबी आझाद यांना पक्षाकडून जी वागणूक दिली त्यानेही कॉंग्रेसचे नेते दुखावले आहेत. गुलाम नबी आझाद नुकतेच राज्यसभेमधून निवृत्त झाले आहेत. इतर पक्ष आझाद यांना राज्यसभेची जागा देण्यास तयार होते. पंतप्रधान मोदींनी त्यांच्याबद्दल खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. पण आमच्या पक्षाने त्यांचा कुठलाही सन्मान केला नाही. त्या उलट रॉबर्ट वाड्रांचा खटला लढणार्‍या वकीलाला राज्यसभेची जागा दिली गेली, असं सूत्रांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here