म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

अभिनेत्री व तिची बहीण यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयातील संबंधित कागदपत्रे मागवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला दिले. १२ मार्चपर्यंत संबंधित सर्व कागदपत्रे मागवून घ्यावी आणि हा विषय पुन्हा २२ मार्चला सुनावणीस ठेवावा, असे निर्देश देऊन न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने तोपर्यंत कंगना व रंगोलीला असलेले अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण कायम ठेवले.

वाचा:

दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण व्हावी आणि समाजात अशांतता निर्माण होऊन कायद्याने प्रस्थापित केलेल्या सरकारविरोधात असंतोष निर्माण व्हावा, या हेतूने दोन्ही बहिणींनी सोशल मीडियावर वारंवार आक्षेपार्ह विधाने केली, अशी तक्रार बॉलीवूडमधील कास्टिंग डायरेक्टर व फिटनेस ट्रेनर मुनावरअली सय्यद यांनी वांद्रे न्यायालयात केली होती. त्याची दखल घेत न्या. जयदेव घुले यांनी पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे आदेश १६ ऑक्टोबर, २०२० रोजी दिले होते. त्यानुसार, पोलिसांनी १७ ऑक्टोबर रोजी कंगना व रंगोलीविरोधात भारतीय दंड संहितेच्या १२४-अ (देशद्रोह) या कलमाबरोबरच १५३-अ (धार्मिक व जातीय सलोखा बिघडवणे) व २९५-अ (धार्मिक भावनांना ठेच पोचवणे) या कलमांखाली एफआयआर नोंदवला. त्यामुळे दोन्ही बहिणींनी अॅड. रिझवान सिद्दिकी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली.

‘दंडाधिकारी न्यायालयात तक्रारीच्या अनुषंगाने दाखल कागदपत्रे आणि उच्च न्यायालयात दाखल झालेली कागदपत्रे यात तफावत आहे’, असे अॅड. सिद्दिकी यांनी निदर्शनास आणले. तेव्हा, ‘तक्रारदाराने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची प्रत पोलिस उपायुक्तांकडेही पाठवली होती. मात्र, त्यातील तारखेविषयी काही तरी चूक असल्याचे दिसते’, असे तक्रारदार सय्यद यांच्यातर्फे अॅड. रिझवान मर्चंट यांनी सांगितले. त्यामुळे खंडपीठाने वांद्रे न्यायालयातून संबंधित कागदपत्रे मागवली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

29 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here